नाशिक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची बैठक होणार - अजित पवार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसंदर्भात उद्या महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नाशिकमध्ये काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज न भरल्यानं हा पेच निर्माण झाला असल्याचं ते म्हणाले. नाशिक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी कोणाला पाठिंबा देईल, हे उद्या ठरेल, असं त्यानीं सांगितलं.