देशातल्या युवकांमध्ये शिस्त आणि नेतृत्व गुण रुजवण्यात एनसीसीचं योगदान आदर्शवत आहे - जनरल अनिल चौहान

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातल्या युवकांमध्ये शिस्त आणि नेतृत्व गुण रुजवण्यात एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेचं योगदान आदर्शवत आहे, असं संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज नवी दिल्ली इथं करिअप्पा संचलन मैदानावर एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबिराला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.

राष्ट्र उभारणीत तसंच लोकांमध्ये सामाजिक जनजागृती करण्यामध्ये एनसीसीनं दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की, देशातल्या सागर किनाऱ्यावर प्लास्टीकचा कचरा हटवून त्याचं रिसायकलिंग करण्यासाठी पुनीत सागर अभियान सुरू केलं आहे.

या अभियानात आतापर्यंत १३ लाख छात्र सैनिकांनी भाग घेतला असून सुमारे २०८ टन प्लास्टीक कचरा गोळा केला आहे. त्यापैकी १६७ टन प्लास्टीक रिसायकलिंगसाठी पाठवलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये छात्र सैनिकांनी केलेल्या चमकदार कामगिरीचं त्यांनी कौतूक केलं.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image