नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त देशभरातील शाळांमधून चित्रकला स्पर्धेच आयोजन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त आज शिक्षण मंत्रालयानं संपूर्ण देशभरातील 500 केंद्रीय विद्यालयांमध्ये राष्ट्रव्यापी चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आज पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जात आहे.

परीक्षा योद्धा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित चित्रकला स्पधेचा विषय असून विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी परीक्षा पे चर्चा 2023 कार्यक्रमांतर्गत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

या स्पर्धेतील 5 सर्वोत्तम स्पर्धकांना स्वातंत्र्य सेनानी तसचं महत्वपूर्ण राष्ट्रीय विषयांवर आधारित पुस्तकांचा संच आणि प्रमाणपत्र भेट देण्यात येईल.या स्पर्धेत देशभरातून जवळपास 50 हजार विद्यार्थी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.