अब्दुल रहमान मक्की याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत मंजूर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने पाकिस्तानस्थित दहशतवादी अब्दुल रहमान मक्की याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे. लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि २६/११ हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा तो जवळचा नातलग आहे. भारतात, विशेषतः जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी तरुणांची भरती करणं आणि दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवणं या कामात मक्कीचा हात होता; त्यामुळे भारत आणि अमेरिकेने याआधीच त्याला दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे.

यापूर्वीच मक्कीला दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव भारतातर्फे सुरक्षा परिषदेत मांडण्यात आला होता. त्यावेळी चीनने नकाराधिकाराचा वापर करुन प्रस्ताव रोखला होता. मात्र आता एकूण १५ सदस्यांपैकी १४ सदस्यांनी भारताची बाजू घेतल्यानं चीनला नकाराधिकार मागे घ्यावा लागला.

Popular posts
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान - निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा
Image
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
Image
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारतानं सादर केलेल्या अजेंड्याला सदस्य देशांची प्राथमिक पातळीवर सहमती
Image