मराठी भाषा ही मुळातच अभिजात आहे, त्यामुळे वेगळा दर्जा देण्याची गरज नाही- कौतिकराव ठाले पाटील

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी भाषा ही मुळातच अभिजात आहे, त्यामुळे वेगळा दर्जा देण्याची गरज नसल्याचं मत, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं मराठी भाषा पंधरवाडा निमित्त, ’जागर मराठीचा’या अभिनव कार्यक्रमाचं उद्घाटन, ठाले पाटील यांच्या हस्ते झालं.

यावेळी ’औरंगाबाद जिल्हयाची साहित्य आणि सांस्कृतिक परंपरा’या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. मराठी विभाग प्रमुख डॉ.दासू वैद्य यावेळी उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार मिळाल्याच्या औचित्याने, कवी हबीब भंडारे यांचा ठाले पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.