चंद्रपूर जिल्ह्यात भारतीय समाज सेवा संचालित मातोश्री वृद्धाश्रमाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याचं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : चंद्रपूर जिल्ह्यात विसापूर इथल्या, भारतीय समाज सेवा संचालित मातोश्री वृद्धाश्रमाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. हा वृद्धाश्रम म्हणजे गृहपरिवार असल्याचं म्हणत, फडनवीस यांनी वृद्धाश्रमाच्या आजवरच्या कामाची प्रशंसा केली. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, संस्थेच्या अध्यक्ष आणि माजी मंत्री शोभाताई फडनवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.