नायलॉन मांजावर बंदी असूनही बेकायदेशीर विक्री सुरू

 

मुंबई (वृत्तसंस्था) : पतंग उडवताना वापरल्या जाणाऱ्या घातक नायलॉन मांजावर बंदी असून त्याची बेकायदा विक्री होत आहे का, याची तपासणी करण्यासाठी आज नंदुरबार नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी मोहीम राबवली. शहरातल्या बालाजी वाडा, अमर टॉकीज, मंगळ बाजार, जळका बाजार या भागात पंतगांच्या विक्रेत्यांकडे जात पालिका कर्मचाऱ्यांनी मांजाची तपासणी करुन नॉयलॉन मांजाबाबत शहानिशा केली. यापूर्वी एका विक्रेत्यावर गुन्हा दाखल झाला असून आजच्या तपासणीत नायलॉन मांजा मिळाला नाही, असं अधिकृत सूत्रांनी सांगितलं.