RRR या चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी २ नामांकनं

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एस एस राजमौली दिग्दर्शित RRR या चित्रपटाला जानेवारी २०२३ मध्ये होणाऱ्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी दोन नामांकनं मिळाली आहेत. जानेवारी 2023 मध्ये या पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट अभिनव गाणे या दोन श्रेणींसाठी नामांकन मिळालं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या दोन क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर हे प्रमुख भूमिकेत होते. हा चित्रपट मार्चमध्ये जगभरात पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता.