प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, राज्यसरकार वाहनांच्या पासिंगचे नियम आणखी कडक करणार

 


मुंबई (वृत्तसंस्था) : प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न सरकारसाठी महत्वाचा असून, परिवहन विभागातर्फे करण्यात येणाऱ्या वाहनांच्या पासिंगचे नियम आणखी कडक करण्यात येणार असल्याचं, मंत्री शंभुराज देसाई यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. आठ ऑक्टोबरला नाशिक - औरंगाबाद मार्गावर खाजगी बसला झालेल्या अपघातात १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यामुळे मनमानी कारभार करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स आणि प्रवाशांचा सुरक्षेचा मुद्दा आमदार सचिन अहिर यांनी उपस्थित केला होता.