चीनमधील वाढत्या कोविड रुग्णसंख्येबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक आरोग्य संघटनेनं, चीन मधील वाढत्या कोविड रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. चीनमधील कोरोनाच्या परिस्थितीचं मूल्यांकन करण्यासाठी, आजाराची गंभीरता, रुग्णांची रुग्णालयात होणारी भरती आणि गंभीर रुग्णांवर अति दक्षता विभागात करण्यात येणाऱ्या उपायांची माहिती संघटनेकडे असणं आवश्यक आहे असं संघटनेचे संचालक टेड्रोस घेब्रेयेसस यांनी काल झालेल्या साप्ताहिक वार्ताहर परिषदेत सांगितलं.

कोविड-१९ च्या उद्रेकाचा उगम जाणून घेण्यासाठी चीनने आपल्याकडील माहिती संघटनेला द्यावी असं ते म्हणाले. या आजाराशी लढा देण्यासाठी, मागील वर्षाच्या तुलनेत आपण अधिक चांगल्या स्थितीत असलो, तरीही अजून कोरोनाचा धोका संपला असं निश्चितपणे सांगता येणार नाही असं घेब्रेयेसस यांनी स्पष्ट केलं.