बनावट प्रमाणपत्राच्या आधारे मेडिकल कॉऊंसिलला नोंदणी मिळवल्याप्रकरणी देशभरात ९१ ठिकाणी सीबीआयचे छापे

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशात वैद्यकीय पदवी घेतल्याच्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे मेडिकल कॉऊंसिलला नोंदणी मिळवल्याप्रकरणी कथित अनियमितता आढळल्यावरून आज सीबीआयनं देशभरात ९१ ठिकाणी छापे टाकले. यात राज्यातल्या मुंबई, पुणे, जळगाव, बुलडाणा या शहरांचा समावेश आहे.

सीबीआयनं यासंदर्भात २१ डिसेम्बरला राज्यातल्या मेडिकल कॉऊंसिलमधल्या अज्ञात सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. देशातल्या विविध राज्यात परदेशी शिकून आलेल्या ७३  वैद्यकीय पदवीधारांनी अनिवार्य पात्रता परीक्षेत पात्र ठरलेले नसतानाही मेडिकल कॉउंसिलमध्ये नोंदणी करून घेतली असल्याचा आरोप यात ठेवला आहे. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image