परकीय योगदान नियमन कायदा उल्लंघनाचा प्रश्न टाळण्यासाठी विरोधक भारत-चीन मुद्दा उपस्थित करत असल्याचा अमित शहा यांचा आरोप

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजीव गांधी फाऊंडेशनद्वारे परकीय योगदान नियमन कायदा,अर्थात एफसीआरएच्या उल्लंघनाचा प्रश्न टाळण्यासाठी विरोधक भारत-चीन मुद्दा उपस्थित करत असल्याचा आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी आज केला.

संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, फाऊंडेशनला २००५-२००७ दरम्यान चिनी दूतावासाकडून १ कोटी ३५ लाख रुपयांचं मिळालेलं अनुदान हे एफसीआरएच्या नियमांचं उल्लंघन करणारं होतं.

शहा म्हणाले की शासनानं नियमानुसार राजीव गांधी फाऊंडेशनची नोंदणी रद्द केली आहे. ते म्हणाले, लोकसभेत त्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता पण काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी कामकाजात व्यत्यय आणला. 

Popular posts
केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image