केंद्र शासनाच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाची सोलर रूफटॉप ही योजना सुरू

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र शासनाच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं सोलर रूफटॉप ही योजना सुरू केली आहे. अकोला जिल्ह्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत १ हजार ६७२ वीज ग्राहकांनी घराच्या गच्चीवर रूफटॉप सोलर पॅनेल नेट मीटरिंग ही यंत्रणा बसवून घेतली आहे. त्यातून तब्बल २२ लाख ६६ युनिटची वीजनिर्मिती झाली असून, शिल्लक राहिलेली वीज हे ग्राहक महावितरणला विकून ते पैसेही कमवत आहेत. महावितरण प्रति युनिट प्रमाणे शिल्लक वीज ग्राहकाकडून विकत घेते. या योजनेंतर्गत सरकार ग्राहकांना सोलर रूफटॉप बसवण्यासाठी अनुदानही देत आहे.