प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेतंर्गत माजी सैनिक,विधवांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती दिली जाणार

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीच्या केंद्रीय सैनिक मंडळामार्फत प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेतंर्गत माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या मुलांसाठी 36 हजार आणि ३० हजार रूपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या शिष्यवृत्तीच्या लाभासाठी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंज अर्ज करावेत, असं आवाहन  सातारा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयानं केलं आहे. अर्ज करणाऱ्या पाल्यांना  बारावी आणि पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण असणं अनिवार्य आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे अशा पाल्यांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शिष्यवृत्तीची अधिक माहिती www.ksb.gov.in या संकेतस्तळावर उपलब्ध आहे.