नागपूर येथील देशपांडे सभागृहात मंगळवारी ‘राष्ट्रपुरुष अटल’ महानाट्य; राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून आयोजन

 


नागपूर : देशाचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणारे ‘राष्ट्रपुरुष अटल’ हे महानाट्य राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने मंगळवारी, २७ डिसेंबर रोजी येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आले आहे.

नागपूर येथील प्रयास बहुउद्देशीय संस्थेद्वारा निर्मित या महानाट्यातून १७५  पेक्षा जास्त  कलावंत सहभागी होणार आहेत.

महानाट्याच्या या प्रयोगाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अन्य मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या प्रयोगास राज्य मंत्रिमंडळाचे सन्माननीय सदस्य,  विधानसभा / परिषदेचे सन्माननीय सदस्य उपस्थित राहणार आहेत. नागपुरातील रसिकांनी या महानाट्यास अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.