सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारची दररोज दादागिरी - नाना पटोले

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सीमाप्रश्नी कर्नाटक सरकार दररोज दादागिरी करत आहे. पण त्यापुढं महाराष्ट्राचं राज्य सरकार मात्र बोलत नाही, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज नागपूरच्या विधानभवन परिसरात बातमीदारांशी बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाल्यानंतरही कर्नाटककडून जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या विरोधात गरळ ओकली जात आहे. महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही अशा वल्गना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई करत आहेत.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात केंद्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे पण केंद्र सरकार हस्तक्षेप करत नाही. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आजही महाविकास आघाडीनं शिंदे फडनवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. कर्नाटकच्या दादागिरी विरोधातही बोम्मईचा सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या. नागपुरातलं भूखंड प्रकरण, महापुरुषांचा अपमान या मुद्द्यांवर, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशाही घोषणा देण्यात आल्या.

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर
Image
देशात काल ३ लाख ४६ हजार ७८६ रुग्णांची नोंद
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे मार्च महिन्याचे मानधन
Image