विविध जिल्ह्यांमधल्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ऑफलाईन नामनिर्देशनपत्र सादर करायला मुभा

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध जिल्ह्यांतल्या ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑफलाईन, अर्थात पारंपरिक पद्धतीनं नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली असून, त्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी आज दिली. राज्य निवडणूक आयोगानं 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातल्या 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक पद्धतीनं 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येतील असं मदान यांनी सांगितलं.