नाशिकमधल्या आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूलचे ३२ वैमानीक भारतीय हवाई दलात दाखल

 


मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिकमधल्या आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूल म्हणजेच कॅटसमध्ये लढाऊ विमान उड्डाणाच्या खडतर प्रशिक्षणानंतर आज ३२ वैमानीक भारतीय हवाई दलात दाखल झाले. आज सकाळी नाशिकमध्ये हा दीक्षांत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी खडतर वैमानिक प्रशिक्षण आणि प्राथमिक रमिोट उड्डाण एअर क्राफ्ट सिस्टीमचे प्रशिक्षण घेणाऱ्या ५७ अधिकाऱ्यांनी शानदार संचालन केलं. या दीक्षांत समारंभाला आर्मी एव्हीएशन कोरचे महानिदेशक तसचं कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी आणि कॅटसचे कमाडंट बिग्रेडीयर संजय वढेरा, कर्नल डी. के. चौधरी हे उपस्थित होते. उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी नमन बन्सल यांना यावेळी सिल्व्हर चित्ता पुरस्कार देण्यात आले. यावेळी कॅप्टन आर्या, कॅप्टन मलिका नेगी, कॅप्टन गौरी महाडीक आणि कॅप्टन अनुमोहा या महिला अधिकाऱ्यांनीही यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केलं. एका नायझेरीयन सैनिकानंही हे प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. या सोहळ्यानंतर चित्तथरारक हवाई कसरती सादर करण्यात आल्या.