जम्मू कश्मीरमध्ये आज पहाटे झालेल्या चकमकीत ३ दहशतवादी ठार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू कश्मीरमध्ये आज पहाटे शोपियां जिल्ह्यातील मुंझ मार्ग गांवात  संरक्षण दलाशी झालेल्या चकमकीत लश्कर-ए-तैय्यबाचे तीन दहशतवादी मारले गेले. दोन दहशतवाद्यांची ओळख पटली असून एक शोपियां इथला तर दुसरा अनंतनागचा आहे. ते दोघे हि काश्मीरी पंडित पूरणकृष्ण भट्ट आणि नेपालच्या तिळबहादुर थापा यांच्या हत्येत सामील होते. त्यांच्याकडून एक ए.के. ४७ राइफल आणि दोन पिस्तुल हस्तगत करण्यात आली आहेत.