एलन मस्‍क यांना कंपनीच्या मुख्य पदावरून काढून टाकण्याच्या बाजूनं ट्विटरच्या लाखों वापरकर्त्यांची मतं

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ट्विटरच्या लाखों वापर कर्त्यांनी  एलन मस्‍क यांना  कम्‍पनीच्या   मुख्य पदावरून  काढून टाकण्याच्या बाजूनं मत व्यक्त केलं आहे.  एलन मस्‍क यांनी स्वतः  या संदर्भात  मतदान घेतलं आहे .  मस्क यांनी  कंपनीच्या  मुख्‍य कार्यकारी अधिकारी पदावर राहावं की नाही, हे ट्विटरच्या वापरकर्त्यांना मस्‍क यांनी एका संदेशाद्वारे  मतदान करून विचारल होत. त्यावर  एक कोटी  70 लाखाहुन  अधिक मतं पडली.  त्यातील जवळपास 57 पूर्णांक ५ टक्के  वापरकर्त्यांनी मस्‍क यांना हटवावं, असं मत नोंदवलं होत.

तर ४२ टक्के लोकांनी  मास्क यांनी या पदावर राहावं, असं मत नोंदवलं होत.  मतदानाच्या निकालाच  आपण पालन करू, असं मस्क यांनी म्हटलं होत. दरम्यान अजून तरी मस्क पद सोडणार किंवा अन्य कोणी व्यक्ती नियुक्त केली जाणार याबाबत अजून निर्णय झालेला नाही. मस्‍क यांनी याआधीच्या एका ट्विट मध्ये सर्व प्रमुख  धोरणात्मक बदल मतदानाच्या  माध्‍यमातून निश्चित  केले जातील असं  म्हटलं होत.