राष्ट्रीय महामार्ग क्रमाक ४ वरील अतिक्रमण व सेवा वाहिन्या काढून घेण्याचे आवाहन

 

पुणे : राष्ट्रीय महामार्ग क्रमाक ४ वरील खेड शिवापूर-नवीन कात्रज बोगदा-नवले पूल- वारजे दरम्यान दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवर अनाधिकृतपणे करण्यात आलेले अतिक्रमण तसेच सेवा वाहिन्या ७ दिवसाच्या आत स्वखर्चाने काढून घेण्याचे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्यावतीने करण्यात आले आहे.

मिळकतधारकांनी अनाधिकृतपणे केलेले अतिक्रमण व विनापरवाना बांधकाम मुदतीत काढून न घेतल्यास ती दि कन्ट्रोल ऑफ नॅशनल हायवेज (लॅन्ड अँड ट्राफिक) ॲक्ट २००२ अन्वये निष्कासित करण्यात येतील तसेच त्याचा खर्च व दंड संबंधितांकडून वसूल करण्यात येईल.

प्राधिकरणाच्यावतीने ही अतिक्रमणे काढताना, सेवा रस्त्याची सुधारणा करताना काही नुकसान, असुविधा झाल्यास याला प्राधिकरण जबाबदार राहणार नाही, असे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे पुणे येथील प्रकल्प संचालक संजय कदम यांनी स्पष्ट केले आहे.

Popular posts
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना आवाहन
Image
14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अनाथ प्रमाणपत्र पंधरवड्याचे आयोजन
Image
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आता ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ म्हणून ओळखले जाणार
Image
राज्यातील विविध जिल्ह्यांत परतीच्या पावसाची हजेरी
Image
अर्जेंटिनाविरुद्ध हॉकीच्या चौथ्या सराव सामन्यात भारताचा विजय
Image