रोजगार हमी योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या कामांची गती वाढवण्याचे निर्देश

 


मुंबई (वृत्तसंस्था) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या कामांची गती वाढवण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत बोलत होते. या योजनेत ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची असून, ग्रामसेवकांनी त्यांच्याकडे सोपवलेली कामं गुणवत्तापूर्ण आणि अधिक गतीनं करावीत, फलोत्पादन विभागामार्फत प्रायोगिक तत्त्वावर एक आधुनिक कांदाचाळ निर्माण करुन त्याचा खर्च, कांद्याची सुरक्षा, शेतकऱ्यांना होणारा फायदा - तोटा यांचा अभ्यास करावा, अशा सूचना भुमरे यांनी यावेळी दिल्या.