विधिमंडळ कामकाजाच्या माहितीसाठी ‘महाअसेंब्ली ॲप’ उपलब्ध
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : विधिमंडळ कामकाजाची दैनंदिन माहिती, बैठका, विविध योजना आदींची माहिती देणारे ‘महाअसेंब्ली ॲप’ उपलब्ध आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत तर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत दिली.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी हे ॲप (MH Assembly) तयार केले असून विधिमंडळ कामकाजाबाबत माहिती मिळण्यासाठी सर्व सदस्यांनी या ॲपचा वापर करावा, असे आवाहन अध्यक्ष ॲड. नार्वेकर आणि उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी केले आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.