आय सी आय सी आय बँक घोटाळा प्रकरणी व्हिडीओकॉन उद्योगाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना अटक

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आय सी आय सी आय बँक घोटाळा प्रकरणी सीबीआय म्हणजेच केंद्रीय अन्वेषण संस्थेनं व्हिडीओकॉन उद्योगाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना मुंबईतून अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी सीबीआयने आय सी आय सी आयबँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली. त्यापूर्वी या तिघांविरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आला.  व्हिडीओकॉन उद्योगसमूहाला २०१२ मध्ये सुमारे तीन हजार कोटी रुपयांचं कर्ज देताना फसवणूक आणि अनियमितता झाल्याच्या आरोपांविषयी ही चौकशी सीबीआय करीत आहे.