शाश्वत विकासाच्या ध्येयाला गती देण्यासाठी मुंबई जी २० कार्यकारी गटाच्या सर्व देशांची चर्चा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत G20 विकास कार्यगटाची तीन दिवसीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत शाश्वत विकासाच्या ध्येयाला गती देण्यासाठी सर्व देश डेटा विषयक भूमिकेवर चर्चा करत आहे. सहभागी प्रतिनिधी, समस्या आणि त्यातील अंतर ओळखुन त्यावरील मोजमापावर लक्ष केंद्रित करतील. हे प्रतिनिधी डेटासंबधी भागीदारी आणि नाविन्यपूर्ण उपायांवर चर्चा करतील. डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुपच्या बैठकीत, भारतानं विकासासाठी डेटावरील G20 उपक्रमाचा प्रस्ताव दिला आहे. भारतानं सांगितले की, डेटाचं विभाजन कमी करण्यासाठी क्षमता निर्माण नेटवर्कद्वारे डेटा हार्नेसिंग मजबूत करण्यास मदत होईल. यामुळे शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने प्रगतीचा वेग वाढविण्यातही मदत होईल.