भारत -बांगलादेशानं सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर लवकरच चर्चा सुरू करण्याबाबत सहमती

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेशानं सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर लवकरात लवकर चर्चा सुरू करण्याबाबत सहमती दर्शवली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि बांगलादेशाचे वाणिज्य मंत्री टिपू मुन्शी यांच्यात बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार कराराच्या शक्यतेवर सहमतीनंतर झालेल्या अभ्यासानुसार सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि व्यावसायिक भागीदारीमध्ये मोठी वाढ होऊ शकते. या करारामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊन दोन्ही देशांमध्ये सामाजिक-आर्थिक विकासाच्या विविध संधी निर्माण होतील. या बैठकीत दोन्ही मंत्र्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. 

Popular posts
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान - निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा
Image
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
Image
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारतानं सादर केलेल्या अजेंड्याला सदस्य देशांची प्राथमिक पातळीवर सहमती
Image