राजकीय पक्षांच्या नेत्यांनी परस्परांच्या दिवंगत नेत्यांवर चिखलफेक करणं थांबवावं - राज ठाकरे यांचं आवाहन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राजकीय पक्षांच्या नेत्यांनी परस्परांच्या दिवंगत नेत्यांवर चिखलफेक थांबवावी, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ते मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या विधानावरून राज ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देत, सावरकरांनी धोरणाचा भाग म्हणून इंग्रजांकडे दयेचा अर्ज केल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.