ज्येष्ठ अभिनेते स्वर्गीय विक्रम गोखले यांच्या पार्थिवाचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतले अंत्यदर्शन

 

पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या पार्थिवाचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बालगंधर्व मंदीर येथे अंत्यदर्शन घेवून त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.

राज्यपाल महोदयांच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर, उपविभागीय अधिकारी संतोष कुमार देशमुख आदी उपस्थित होते.