राज्य सरकारकडून मुंबईत रोजगार मेळाव्यात सरकारी नोकरीसाठी नियुक्तीपत्र प्रदान
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : वर्षभरात ७५ हजार जणांना सरकारी नेकऱ्या देणाऱ्या राज्यशासनाच्या महत्वाकांक्षी प्रयत्नाचा पहिला टप्पा आज मुंबईसह राज्यभरात विभागीय स्तरावर संपन्न झाला. आज २ हजार जणांना नियुक्ती पत्र देत असल्याची घोषणा मुंबईच्या सोहळ्यात करण्यात आली. सरकारी नोकरीसाठी इच्छुकांनी कुठल्याही अवैध मार्गाच्या आहारी न जाता प्रामाणिक प्रयत्न करावेत, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं. तर छोट्या छोटया कारणांसाठी न्यायालयात जाऊ नये. त्यामुळे भरती प्रक्रिया लांबते आणि अंतिमतः त्याचा फटका विद्यार्थ्याना बसतो, याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी लक्ष वेधलं. सरकारी नोकरी ही एक सेवा आहे, हे जाणून लोकांचे सेवेकरी व्हा, असं आवाहनही त्यांनी नवनियुक्त उमेदवारांना केलं.आठवड्याभरातच पोलीस दलातल्या १८ हजार ५०० पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार असून लवकरच ग्रामविकास विभागात १० हजाराहून अधिक पदांची भरती करण्यात येणार आहे, असंही यावेळी सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं. पुणे विभागात ३१६ उमेदवारांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पहिल्या टप्यातला नियुक्ती पत्रं प्रदान करण्यात आली. तर नागपूरमध्ये आज जवळपास २०० उमेदवारांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.