आंतरराष्ट्रीय दर्जाचं कृषी कन्वेंशन केंद्रासाठी १५० कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याची नितीन गडकरी यांची माहिती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागपूर इथं डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं कृषी कन्वेंशन केंद्र स्थापन केलं जाणार आहे. यासाठी १५० कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे पाठवला असल्याची माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते आज डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित १३ व्या ऍग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारोहात बोलत होते.

या कन्वेंशन केंद्राला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचं आश्वासन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिल्याचं गडकरी यांनी सांगितलं. चार दिवस चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनात ऊस शेती, विदर्भात मत्स्य व्यवसायाचा विकास, बांबू उत्पादनातून संधी, विदर्भाचा दुग्ध विकास या मुख्य परिषदांसह विविध विषयांवर विस्तृत कार्यशाळा होणार आहेत, असंही ते म्हणाले. 

अ‍ॅग्रोव्हिजन कृषी क्षेत्रासाठी दिशादर्शक आहे. मध्यप्रदेश सरकारनं मागील अनेक वर्षांपासून परंपरागत शेती टाळून अ‍ॅग्रो व्हिजन‘धील सूचनांचा, तसेच नवीन तंत्राचा वापर करून शेती समृद्धीच्या स्तरावर नेऊन ठेवली आहे. हे सर्व अ‍ॅग्रो व्हिजनच्या  मार्गदर्शकतेचं तेच फलित आहे, असं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ‘मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री  शिवराजसिंग  चौहान यांनी म्हटलं. यंदाच्या प्रदर्शनाची  संकल्पना 'अन्न, चारा आणि इंधन ' - भविष्यातील शेती ' अशी आहे.