नवी ई - पॉस मशिन देण्याची अकोल्यातल्या स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची मागणी

 


मुंबई (वृत्तसंस्था) : स्वस्त धान्य दुकानदारांना याआधी दिलेली ई - पॉस टू जी मशीन या कालबाह्य होत चाललेल्या, तंत्रज्ञानावर चालणारी आहेत, त्यामुळे अनेकदा ती बंद पडतात. ही अडचण दूर करण्यासाठी नवी ई - पॉस मशिन द्यावी अशी मागणी अकोल्यातल्या स्वस्त धान्य दुकानदार संघटनेनं केली आहे. संघटनेनं आपल्या या मागणीचं लेखी निवेदन आज तहसीलदारांना सादर केलं. जुन्या मशीनवर अत्यंत धीम्या गतीनं काम चालतं, त्यामुळे ग्राहक अनेकदा वाद घालतात, त्यामुळे या मशीन बदलणं गरजेचं असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.