राज्यात थंडीचा कडाका वाढला, अनेक जिल्ह्यात तापमानात लक्षणीय घट

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, अनेक जिल्ह्यात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. नाशिक मध्ये पारा आणखी घसरला असून आज सकाळी नऊ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकी हंगामातली निच्चांकी नोंद झाली आहे. तर निफाड तालुक्यात सात पूर्णांक चार दशांश अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. ग्रामीण भागात अति थंडीमुळे द्राक्ष पिकाला धोका निर्माण होऊ शकतो, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.