रेल्वे सुरक्षा भर्तीबाबत माध्‍यमांवर बनावट संदेश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वे सुरक्षा दलामध्‍ये मध्ये हवालदार आणि सहाय्यक उप निरीक्षकांच्या नऊ हजार ५०० पदांच्या भर्तीबाबत समाज माध्‍यमांवर आणि वर्तमानपत्रांमध्‍ये एक बनावट संदेश प्रसारित केला जात आहे.

आरपीएफ किंवा रेल्वे मंत्रालयानं त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा कोणत्याही छापील किंवा इलेक्ट्रॉनिक माध्‍यमाद्वारे अशी कोणतीही अधिसूचना जारी केली नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.