दहशतवादामुळे मानवतेला धोका असल्याचं परराष्ट्र मंत्र्यांचं मत

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादामुळे मानवतेला धोका असल्याचं मत  परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज व्यक्त केलं आहे. मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचं  स्मरण करून डॉ. जयशंकर म्हणाले की, भारतासह संपूर्ण जग आज  २६/११ च्या पीडितांना स्मरण करत आहे. भारत नेहमीच जागतिक शांतता आणि सामाजिक सौहार्दाचा आश्रयदाता राहिला आहे, परंतु दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी हा  देश कटिबद्ध आहे असं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, त्यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यात लोकांचे रक्षण करताना ज्यांनी सर्वोच्च बलिदान दिले त्यांना त्यांनी आदरांजली वाहिली.