पंढरपूर मध्ये कार्तिकी यात्रेनिमित्त वाहतूक मार्गात बदल

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर इधं या महिन्याच्या ४ तारखेला होणाऱ्या कार्तिकी यात्रेनिमित्त शहरात तसंच शहरा बाहेरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल १ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर २०२२ या कालावधीपर्यंत राहणार आहे.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. नगर, बार्शी, सोलापूर, मोहोळकडून येणारी वाहने करकंब क्रॉस रोड, शेटफळ चौक मार्ग विसावा इथं पार्क करावीत. ६५ एकर इथं फक्त दिंडी आणि पालख्यांची वाहनं पार्क करावीत. पुणे, सातारा, वाखरी, मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस व इसबावी मैदानात पार्क करावीत.

कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला मार्गे येणारी वाहने कासेगांव फाटा, टाकळी बायपास मार्गे येवून टाकळी हायस्कूल आणि वेअर हाउस इथं  पार्क करावीत. कॉलेज क्रॉस रोड ते सरगम चौक ते सावरकर चौक ते नवीन कराड नाका यामार्गावर एकेरी वाहतुक राहील. असं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.