‘मन की बात’ कार्यक्रमाच्या आगामी भागासाठी नागरिकांनी कल्पना आणि सूचना पाठवाव्यात-प्रधानमंत्री

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमाच्या आगामी भागासाठी नागरिकांनी त्यांच्या कल्पना आणि सूचना पाठवाव्यात असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. २७ नोव्हेंबरला प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमासाठी नागरिक मायजीओव्ही संकेतस्थळ, नमो ऍपवर संदेश पाठवू शकतात. तसंच १८००-११-७८०० या दूरध्वनी क्रमांकावर आपला संदेश हिंदी किंवा इंग्रजी भाषेत ध्वनिमुद्रित करून २५ नोव्हेंबरपर्यंत पाठवू शकतात.