गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातला प्रचार आज संपणार

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातला प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. १ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाची तयारी निवडणूक आयोगानं पूर्ण केली आहे. या टप्प्यात १९ जिल्ह्यांतील ८९ जागांसाठी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातलं मतदान अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे.कच्छ, सुरेंद्रनगर, मोरबी, राजकोट, जामनगर, देवभूमी द्वारका, पोरबंदर, जुनागढ, गीर सोमनाथ, अमरेली, भावनगर, बोताड, नर्मदा, भरूच, सुरत, तापी, डांग्स, नवसारी आणि वलसाड या जिल्ह्यांमध्ये विधानसभा मतदान होणार आहे. मुख्य लढत काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पार्टी यांच्यात आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image