धावपटू पी टी उषा ठरणार भारतीय ऑलिम्पिक्स संघटनेची पहिली महिला अध्यक्ष

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : धावपटू पी टी उषाला भारतीय ऑलिम्पिक संघटनेची पहिली महिला अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. येत्या १० डिसेंबर ला होणाऱ्या निवडणुकीसाठी ती अध्यक्ष पदाची एकमेव उमेदवार आहे. पी टी उषा नं अध्यक्षपदासाठी तर तिच्या संघातल्या १४ जणांनी इतर पदांसाठी काल उमेदवारी अर्ज दाखल केले.

५८ वर्षीय पी टी उषानं अनेक आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकवलं आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या ९५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेता खेळाडू अध्यक्षपद भूषवणार आहे. उपाध्यक्ष पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्यामुळे, राष्ट्रीय नेमबाजी संघटनेचे अजय पटेल यांची निवड निश्चित झाली आहे.

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर
Image
देशात काल ३ लाख ४६ हजार ७८६ रुग्णांची नोंद
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे मार्च महिन्याचे मानधन
Image