३२ व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राला सलग दुसऱ्यांदा दुहेरी मुकुट

 


मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथं ३२ व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत काल महाराष्ट्राच्या मुला-मुलींनी अंतिम फेरीत कर्नाटकवर एका डावानं मात करत सलग दुसऱ्यांदा दुहेरी मुकुटासह अजिंक्यपद मिळवलं. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा भरत पुरस्कार राज जाधवला तर ईला पुरस्कार धनश्री कंकला देऊन गौरवण्यात आलं.