‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ या विषयावर उद्या मुलाखत

 


मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची ‘माझी मुंबई,स्वच्छ मुंबई’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरुवार, दि. 1 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.00 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानाचे महत्त्व, मुंबई उपनगर जिल्ह्यातील 15 वॉर्डमध्ये राबविण्यात येणारे उपक्रम, अभियानात सहभागी होणारे लोकप्रतिनिधी, शासनाचे सर्व विभाग,स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना तसेच नागरिकांचा सहभाग या विषयी सविस्तर माहिती, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.