जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दहशतवादी ठार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीर मधल्या शोपियान जिल्ह्यातल्या कपरेन भागात आज सकाळी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद संघटनेचा एक विदेशी दहशतवादी मारला गेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा दहशतवादी कुलगाम-शोपियान भागात सक्रिय होता. ठार झालेल्या दहशतवाद्याचं  नाव कामरान भाई आहे. हाती आलेल्या शेवटच्या   वृत्तानुसार , या  परिसरात अद्याप सुरक्षा दलाची शोधमोहीम सुरू आहे.