भरडधान्याच्या निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारची कृती योजना
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : भरड धान्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रानं कृती आराखडा तयार केला आहे. 16 आंतरराष्ट्रीय व्यापारी प्रदर्शनं आणि विक्रेता मेळाव्यात, निर्यातदार, शेतकरी आणि व्यापार्यांना सहभागी करून घेण्यासाठी तसंच भारतीय भरडधान्यांचा जगभरात प्रसार आणि निर्यातीसाठी सरकारनं ही योजना आखली आहे. संयुक्त राष्ट्र संघानं 2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केलं आहे.
भरडधान्य उत्पादनात भारत जगभरात आघाडीवर असून, जागतिक उत्पादनात त्याचा वाटा अंदाजे 41 टक्के इतका आहे. 2021-22 या वर्षात भारतानं भरडधान्य उत्पादनात 21 टक्के वाढ नोंदवली असून ती सुमारे 16 दशलक्ष मेट्रिक टन इतकी होती. देशात राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश ही राज्यं भरडधान्य उत्पादनात आघाडीवर आहेत. 2025 पर्यंत भरडधान्याची उलाढाल 9 अब्ज डॉलर्सवरून 12 अब्ज डॉलर्स वर पोहोचेल असा अंदाज आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.