आरबीआय ने ठोठावला वक्रंगी संस्थेला एक कोटी, सत्तर लाख रुपयांचा दंड

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हाईट लेबल एटीएमच्या दिशानिर्देशांच्या तरतुदींचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय ने वक्रंगी संस्थेला एक कोटी, सत्तर लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स कायद्याच्या, २००७ च्या कलम ३० अंतर्गत आरबीआयमध्ये विहित अधिकारांचा वापर करताना हा दंड ठोठावण्यात आला आहे. हा निर्णय नियामक अनुपालनात असलेल्या कमतरतेसाठी घेण्यात आला असून संस्थेने तिच्या ग्राहकांसह केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर आक्षेप घेण्याचा हेतू नसल्याचं आरबीआय ने म्हटले आहे.