१० वर्ष पूर्ण झाल्यानंतर आधार कार्ड अद्ययावत करणं गरजेचं

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं आधार कार्ड नियमांमध्ये काही बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार, आधार कार्ड काढल्याला १० वर्ष पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी एकदा तरी संबंधित दस्तावेज अद्ययावत करणं गरजेचं आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं याबाबत अधिसूचना काढली असून, या अधिसूचनेनुसार, माहिती अद्ययावत केल्यानं आधार कार्डातील माहितीची अचूकता सुनिश्चित होईल.