महाराष्ट्रातल्या १५ लाख लाभार्थ्यांकडून प्रधानमंत्र्यांना आभाराची पत्रं पाठवली जाणार

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्या महाराष्ट्रातल्या १५ लाख लाभार्थ्यांकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आभाराची पत्रं पाठवली जाणार आहेत. केंद्र शासनाच्या योजनांबद्दल ‘धन्यवाद मोदीजी’ हा उपक्रम प्रदेश भाजपनं राबवला आहे. या उपक्रमाच्या निमित्तानं भाजपा प्रदेश कार्यालयात विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.गरिबांना सोयी आणि सवलती मिळाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार कार्यरत असून थेट लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देऊन नरेंद्र मोदी यांनी देशात परिवर्तन सुरु केल्याचं देवेंद्र फडनवीस यांनी यावेळी सांगितलं. तर केंद्र सरकारच्या २७ योजनांच्या माध्यमातून राज्यातल्या ५ कोटी ६५ लाख नागरिकांना लाभ झाल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.