भारतीय हवाई दलाकडून आजपासून ‘अग्नीवीरवायू’साठी नोंदणी सुरु

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी 17 ते 25 वयोगटातल्या युवकांच्या लष्करातल्या 4 वर्षांच्या भरतीसाठी अग्नीपथ ही योजना मंजूर केली होती. या योजनेंतर्गत भारतीय हवाई दल आजपासून ‘अग्नीवीरवायू’साठी नोंदणी सुरु करत आहे. आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरु होईल . नोंदणीसाठी  या महिन्याच्या 23 पर्यंत मुदत आहे. अग्नीवीरवायूसाठी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जातील.  या भरतीसंदर्भातली अधिक माहिती हवाईदलाच्या agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळावर मिळेल.