संरक्षणमंत्री भूषवणार चौथ्या भारत-फ्रान्स वार्षिक संरक्षण संवादाचे सह - अध्यक्षपद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज नवी दिल्लीत फ्रान्सचे सशस्त्र दल मंत्री सेबॅस्टिन लेकोर्नू यांच्यासोबत चौथ्या भारत-फ्रान्स वार्षिक संरक्षण संवादाचे सह-अध्यक्षपद भूषवतील. लेकोर्नू सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. वार्षिक संरक्षण संवादाचा भाग म्हणून, दोन्ही मंत्री दहशतवाद विरोधी कृती संरक्षण संबंध, डो-पॅसिफिक सागरी सुरक्षा आणि भारताच्या “आत्मनिर्भर भारत” धोरणाच्या अनुषंगानं औद्योगिक आणि तांत्रिक भागीदारीवर विस्तृत चर्चा करतील.

फ्रेंच दूतावासाच्या निवेदनानुसार, सेबॅस्टियन लेकोर्नू हे युरोप आणि इंडो-पॅसिफिकमधील परिस्थितीसह समान चिंतेच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांचीही भेट घेतील. दोन दिवसांच्या भारत  दौऱ्यावर आलेले मंत्री राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीही भेट घेतील आणि प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा करतील आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी आमचे घनिष्ट सहकार्य यावर चर्चा होईल. कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मंत्री लेकोर्नू दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देतील.