भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देण्याची वेळ आली असल्याचं प्रधानमंत्र्यांचे प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देण्याची वेळ आली असून यामध्ये देशातील युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय दक्षता आयोगाच्या दक्षता जागरुकता सप्ताहानिमित्त नवी दिल्लीत काल आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

31 ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर या कालावधीत ‘भ्रष्टाचारमुक्त भारत विकसित राष्ट्रासाठी’ या संकल्पनेसह दक्षता जनजागृती सप्ताह पाळला जात आहे. त्यानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सरकारच्या प्रत्येक विभागानं भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची इच्छाशक्ती दाखवली पाहिजे. विकसित राष्ट्र घडवण्यांसाठी विश्वास आणि विश्वासार्हता हे महत्त्वाचे घटक आहेत.असंही पंतप्रधानांनी नमूद केलं. केंद्रीय दक्षता आयोगाच्या नवीन तक्रार व्यवस्थापन प्रणाली पोर्टलचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image