‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव दिनेश सुराणा यांची मुलाखत

 


मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव दिनेश सुराणा यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर शुक्रवार दि. 11, शनिवार दि. 12 , सोमवार दि. 14 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.25  ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने लोकअदालतीच्या माध्यमातून न्याय आणि कार्यक्षम तक्रार निवारण यंत्रणा उपलब्ध करून दिली जाते. यासाठी लोकअदालतीचे जिल्हास्तरावर आयोजन करण्यात येते. या राष्ट्रीय लोकअदालतीचे स्वरूप काय आहे, यात कोणती प्रकरणे निकाली काढली जातात, नागरिकांना कसा फायदा होतो यासंदर्भातील सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव दिनेश सुराणा यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक अर्चना शंभरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.