हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर येत्या ६ डिसेंबरला सर्वपक्षीय बैठक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं येत्या ६ डिसेंबरला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं, यासाठी सर्व राजकीय पक्षांचं सहकार्य मिळवण्याकरता ही बैठक आयोजित केली आहे.

या अधिवेशनात विधायक चर्चा होतील, अशी अपेक्षा केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केली आहे. हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरला सुरु होणार आहे. हे २९ डिसेंबरपर्यंत चालेल.